- कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.
- रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.
- रवा रिफाईन्ड तेलात भाजावा. डालड्यात भाजला तर थंड झाल्यावर डालडा थिजून सांजा घट्ट होतो व सारण पोळीभर न पसरल्यामुळे पोळीला काठ राहतात.
- सांजा गरम असतानाच पाण्याचा हात लावून मऊसर मळावा. लाटताना पोळी फुटून शिरा बाहेर येत नाही.
- सांज कोरडा झाला तर दुधाचा हात लावून मऊसूत करून घ्यावा व मग पोळ्या लाटाव्यात. पोळी फुटून सांज बाहेर येत नाही.
- सांज्याची पोळी भाजण्यास जरा वेळ लागतो. भाजताना वर व खाली तेलाचा हात लावल्यास पोळी लवकर भाजली जाते.
- पोळ्या लाटताना फुटू लागल्या तर सांजा पाण्याच्या हाताने मऊ करून घ्यावा. कणीकही तेल लावून चांगली तिंबून घावी व पोळ्या तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने लाटाव्यात.
No comments:
Post a Comment