Pages

Tuesday, 23 January 2018

पुरणपोळी : पुरण वाटताना...

  • शिजलेले पुरण गरम असतानाच वाटावे, वाटणे सोपे जाते. 
  • पुरण चांगले वाटून बारीक करून घ्यावे, नाहीतर पुरणपोळी हमखास फुटते.
  • पुरणपोळीचे पुरण आणि कणीक सारखीच मऊ करावी, तरच लाटताना पुरण पोळीच्या कडेपर्यंत सरकत जाते. पुरण पातळ आणि कणीक घट्ट झाली तर लाटताना हमखास पुरण पोळीतून बाहेर येते. 
  • डाळ शिजल्यावरच पुरणयंत्रातून काढावी आणि त्यात गूळ किंवा साखर घालून पुरण शिजवावे, वेळ वाचतो. 
  • हरभऱ्याची डाळ शिजल्यावर त्यातले पाणी काढून टाकून ते किंचित ओलसर असतानाच त्यात प्रमाणात गूळ, साखर घालून १५-२० मिनिटांनी मिक्सरमधून काढावे आणि भांड्यात घालून गॅसवर थोडेसे गरम करावे. पुरण वाटण्याची दगदग वाचते. 

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?