Pages

Wednesday, 24 January 2018

पुरणपोळी : कणीक भिजवताना...

  • पुरणपोळीच्या पारीसाठी नेहमी गुजरात लोकवान गहू वापरावा. या गव्हाच्या कणकेला चांगली तार येत असल्याने पोळ्या पटकन तुटत तर नाहीत पण त्यांचा पोतही छान रेशमी वाटतो. 
  • नेहमी आदल्या दिवशी दळून आणलेले पीठ वापरावे. खूप दिवसांपूर्वी दळून आणलेले पीठ पुरणपोळीसाठी कधीही वापरू नये. ताज्या पिठामुळे मळताना तार चांगली येते. 
  • पीठ पिठीच्या चाळणीने चाळून मग भिजवावे. रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी काढावे व तेलाचा हात लावून मळावे. लाटताना तर सोपे जातेच पण पुरणपोळ्याही मऊ लुसलुशीत होतात. 
  • नेहमी अर्धे गव्हाचे पीठ आणि अर्धा मैदा असे प्रमाण घ्यावे. त्यामुळे कणकेला तार चांगली येतेच पण पोळ्याही छान पांढऱ्या दिसतात. 
  • मैद्याच्या चाळणीने पारीचे पीठ चाळून घ्यावे, त्यात बारीक रवा घालून तेल, मीठ न घालता ती पाण्यात भिजवून ठेवावी. पोळ्या करायला घेतल्या की परातीत पळीभर तेल घालून, त्यात अर्धा चमचा मीठ घालून ते एकजीव करावे व त्यात कणीक मळावी. त्यामुळे पुरणपोळ्या मऊसूत होतात.  
  • कणकेत रवा घालायचा झाल्यास अगदी बारीक आणि पांढरा रवा घालावा. 
  • कणकेत रवा घालण्यापूर्वी परातीत रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालून तो १५-२० मिनिटे भिजत ठेवावा. नंतर कणकेत मिसळावा. 
  • कणीक भिजवताना दुधाचा वापर करावा. भिजवताना त्यात किंचित हळद घालावी. पोळ्या खुसखुशीत होतात. 
  • कणीक भिजवताना घट्ट भिजवावी. नंतर ती हवी तशी सैल वा मऊ करता येते. सैल कणीक घट्ट करावी लागली तर प्रमाण बदलते व पोळ्या बिघडतात. 
  • कणकेत किंचितसे मीठ घालावे. पिठाला चांगली तार येते. 
  • तेल आणि पाणी लावून कणीक तिंबल्यास पोळ्या अगदी मऊ होतात.
  • कणीक पुरेशी सैल झाली नाही तर पोळ्या कडक होतात. 
  • साध्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा पुरणपोळीच्या पारीची कणीक सैल मळावी आणि कणीक एका भांड्यात तेल घालून त्यात ठेवावी, म्हणजे तिला चांगली तार येते. 

1 comment:

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?