Pages

Wednesday 31 January 2018

श्रीखंड : चक्का लावताना...


  • दही लावताना प्रथम दूध साधारण गरम करावे नंतर विरजण लावून ते रवीने चांगले घुसळून मगच त्यावर झाकण ठेवावे. ह्या दह्याला पाणी सुटत नाही, ते आंबटही होत नाही आणि साय आतच राहिल्याने चविष्ट होते. 
  • चक्का लावताना नेहमी नायलॉनच्या कपड्याचाच वापर करावा. त्यातून पाणी लवकर बाहेर तर पडतेच शिवाय नायलॉनचा कापड लवकर स्वच्छ करता येतो. त्याला वासही येत नाही. 
  • चक्का लावताना दही स्वच्छ कपड्यावर एका टोपलीत पाच-दहा मिनिटे तरी ठेवावे. त्यामुळे त्यातून बरेचसे पाणी निघून जाते. नंतर ती पुरचुंडी स्वच्छ वर्तमानपत्राच्या घड्यांवर आलटून पालटून ठेवावी. पाणी लवकर निघून गेल्याने चक्काही लवकर तयार होतो.
  • आंबट दह्याचे श्रीखंड चांगले होत नाही, म्हणूनच चक्का लावताना दही गोड आहे याची खात्री करून घ्यावी. चक्का करण्यासाठी दही टांगून असता दही बांधलेल्या कपड्यावर चिलटे बसू नये तसेच चक्क्यातून गळणाऱ्या पाण्याचा वास येऊ नये म्हणून चक्क्याचे गाठोडे बांधले की त्याला बाहेरून प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळावी. 
  • चक्का लावण्यासाठी दही बांधून ठेवले असता त्यात गुठळ्या होतात. गुठळ्या मोडून श्रीखंड करण्यास अधिक वेळ लागतो. म्हणून दही बांधण्यापूर्वी ते रवीने चांगले घुसळून घेतल्यास चक्का लगेचच एकसंध आणि मऊ होतो.  

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?