- खीर करताना कित्येकदा दूध फुटते म्हणून खिरीत दूध घालताना त्याला एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर लावून मग ते ओतावे. दूध फुटत नाहीच पण खीर चांगली दाट आणि पांढरीशुभ्र दिसते.
- दूध फुटेल असे वाटत असेल तरच त्यात चिमूटभर सोडा घालावा.
- जेवढी साखर घालावयाची असेल तर तेवढ्या साखरेचा घट्ट पाक करून खिरीत घातल्यास खीर आळत नाही.
- घट्ट आणि चविष्ट खीर हवी असेल तर ओले खोबरे किसून तांदळासोबत दुधात टाकावे. एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम किसलेले खोबरे पुरेसे आहे.
- खीर करताना ती अगदी पूर्ण शिजल्यानंतरच त्यात हवी तेवढी साखर वा गूळ घालावा.
- खीर खमंग व दाट होण्यासाठी थोड्या साजूक तुपावर तीन-चार लवंगा व थोडे बेसन मंद आचेवर खरपूस भाजावे. खिरीचे दूध हळूहळू त्यात ओतावे. चांगले ढवळून एक उकळी आणावी, नंतर ते दूध खिरीसाठी वापरावे.
- दूध कमी पडले तर गार दुधात कस्टर्ड पावडर किंवा गरम पाण्यात खवा मिसळून खिरीत घालावा.
- खीर तयार झाल्यावर तिच्यावर साय चढतेच. म्हणून त्यावर थोडीशी साखर टाकावी, साय येत नाही.
- वाढताना खीर फार दाट झाली आहे असे वाटल्यास साधे दूध घालून सारखी करून वाढावी.
- खिरीत दोन पेढे कुस्करून घालावे, खीर दाट होतेच शिवाय चवही वेगळीच लागते.
- दुधाचा केशरी मसाला असल्यास खिरीत एक-दोन चमचे घालावा. म्हणजे काजू, केशर, वेलची इ. वेगळे घालण्याची गरज नाही.
- दूध आटतेवेळी जायफळ घालू नये, दूध फाटते. खीर बिघडते.
- खिरीत सुकामेवा आधीच घातल्यास तो तळाला बसतो म्हणून खीर करून झाल्यावर हलक्या हाताने सुक्यामेव्याचे तुकडे करून टाकावे. आणि वाढताना ढवळून वाढावे.
- बटाटा किसण्याच्या किसणीवर बदाम उभा धरून किसावा. भरपूर व पातळ काप मिळतात. ते खिरीत घातल्यास तळाला न जात वर तरंगतात. बदामही कमी लागतात.

No comments:
Post a Comment