- तांदळाची खीर साखरेऐवजी पिवळाधमक गूळ वापरून केल्यास जास्त स्वादिष्ट लागते.
- तांदळाच्या खिरीत गूळ घातल्यास त्यात वेलचीबरोबर थोडे जायफळ व थोडी खसखस पूड करून घालावी. खीर खमंग लागते.
- शेवयाची खीर दाट करण्यासाठी तुपात शेवया आणि एक मोठा चमचा बेसन खरपूस भाजून खिरीत घालावे. खीर दाट तर होतेच शिवाय खिरीला रंगही छान येतो अन चवही.
- शेवयांची खीर आटवताना मिश्रणात थोडे भिजवलेले जाड पोहे घालावेत. खीर लवकर आटते.
- बाजारातील मशीनच्या शेवया लवकर शिजतात व जास्त शिजल्यावर त्याचा गोळा होतो. म्हणून दूध अगोदरच आटवून घ्यावे व शेवया घातल्यानंतर थोडे उकळावे.
- पाकिटातील शेवया भाजलेल्या असतात. अशा शेवया तुपावर पुन्हा भाजायची जरुरी नसते. उकळत्या आटीव दुधात तशाच सोडल्या तरी खीर चांगली होते.
- शेवया थोड्या तुपावर तांबूस परतून घ्याव्या. त्यात थोडे पाणी घालून एक उकळी आणावी. मग गाळण्यात शेवया घालून पाणी काढून टाकावे. शेवया बऱ्याच दिवसांच्या असल्यास किंवा त्यांना वास येत असल्यास तो निघून जातो, तसेच त्यातील मिठाचा अंश निघून जातो.
- खारकेची खीर करताना खारकांचा गर थोड्या पाण्यात शिजवून त्यात साखर घातल्यानंतर शेवटी दूध घातल्यास खीर फुटत नाही.
- खसखस एक तास भिजत ठेवून नंतर वाटून खीर केल्यास ती दाट व खमंग होते.
- खसखशीच्या खिरीसाठी शिळे दूध वापरू नये. त्यामुळे खीर खराब होण्याची शक्यता असते.

No comments:
Post a Comment