- पुऱ्या कधीही एकदम लाटून ठेऊ नये. एक पुरी तळून होईपर्यंतच दुसरी पुरी लाटून झाली पाहिजे.
- पुऱ्या लाटताना पिठी न वापरता तेलाचा हात लावून लाटाव्या, त्यामुळे तेल स्वच्छ राहते.
- पुऱ्या एकसारख्या आकाराच्या, एकाच रंगाच्या आणि किंचित पातळसा पापुद्रा असलेल्या झाल्या तरच त्या मऊ खुसखुशीत लागतात.
- पुरी फार जाड किंवा पातळ लाटू नये, मध्यम लाटावी. चांगली फुगते.
- पुऱ्या कधीही पिठी लावून लाटू नये. त्याऐवजी कणकेत थोडासा मैदा मिसळून पुऱ्या लाटाव्या. पिठी लावल्यास तेलात गाळ जमतो.
- लाटताना पुऱ्या मधोमध किंचित जाड तर काठाला पातळ अशा लाटाव्या. जाड लाटलेल्या पुऱ्या चवीला किंचित कच्च्या लागतात.
- मोठी पोळी लाटून वाटीने कापलेल्या पुऱ्या काठाकडे किंचित जाड लागतात.
- पुऱ्या लाटताना मधून मधून उलटवून लाटाव्या म्हणजे पुरीच्या दोन्ही बाजू सारख्याच लाटल्या जातात.
- पुऱ्या लाटल्यावर स्वच्छ कागदावर सुट्या पसराव्यात. वाढेपर्यंत फुगलेल्या आणि कोरड्या राहतात.
- लाटलेल्या पुऱ्या दहाएक मिनिटे तरी फ्रीजमध्ये ठेवाव्या अन नंतर तळाव्यात, तेलही कमी लागते व कुरकुरीतही होतात.

No comments:
Post a Comment