Pages

Friday, 16 February 2018

पुऱ्या : तळताना...

  • तळायच्या आधी तेलात अर्धा चमचा मीठ टाकावे, पुऱ्या तेलकट लागत नाहीत. 
  • गॅस मंद ठेवला तर पुऱ्या फुगत नाहीत. म्हणूनच गॅस मोठा करावा आणि तेल कडकडीत तापल्यावरच त्यात पुऱ्या सोडाव्या. 
  • पुरी तेलात सोडल्यावर झारीने त्यावर तेल उडवावे. पुरी चांगली फुगते. 
  • पुऱ्या तळताना त्या पांढऱ्या दिसाव्या असे वाटत असेल तर गरम तेलात चार-सहा पेरूची किंवा आंब्याची पाने टाकावी. 
  • तेल गरम झाले म्हणजे आच कमी करावी. पुरी कढईत सोडल्यावर वर येऊ लागली की झाऱ्याने कडेला हलकेच दाबावी, म्हणजे पुरी फुगते. 
  • घरगुती समारंभाकरिता जास्त पुऱ्या करावयाच्या असल्यास मोठा प्लॅस्टिकचा कागद पसरून त्या झाकून ठेवाव्यात. पंचवीस-तीस पुऱ्या लाटल्यावर तळाव्यात. कोरड्या पडत नाहीत. 
  • तळलेल्या पुऱ्या कागदावर पसरून ठेवल्यास फुगलेल्या राहतात.

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?