चक्का विकत घेताना...
- चक्का विकत घेताना चव पाहावी. आंबूस वासाचा चक्का शिळा असतो. कितीही साखर, वेलची घातली तरी श्रीखंडाचा आंबूस वास कायम राहतो.
- चक्का शिळा असल्यास श्रीखंड आंबूस लागते. भरपूर साखर घालूनही त्याचा आंबटपणा जात नाही. अशा वेळी थोड्या दुधात चिमूटभर खाण्याचा सोडा घालून ढवळावे. हे मिश्रण श्रीखंडात एकजीव करावे व काही वेळानंतर वापरावे. श्रीखंडाचा आंबटपणा खूपच कमी होतो.
-----------------------------------------
- श्रीखंड उरले तर मंद गॅसवर आटवावे. त्यात थोडे शुद्ध तूप टाकावे व गार झाल्यावर पिठीसाखर घालून वड्या पाडाव्यात.
- श्रीखंडाच्या वड्या करताना मिश्रण गरम असतानाच त्यात पिठीसाखर घालू नये. त्यामुळे मिश्रण पातळ होते आणि ते पुन्हा शिजवले की त्याची चिक्की तयार होते.

No comments:
Post a Comment