- घारगे करताना पीठ श्रीखंडाइतके सैल झाले की त्यात पीठ घालणे थांबवावे. पोळीच्या कणकेप्रमाणे घट्ट गोळा करू नये.
- गूळ बेताने घालावा, नाहीतर घारगे कडक होतात. घारगे फिकट रंगाचे होण्यासाठी कणकेऐवजी तांदळाचे पीठ आणि गुळाऐवजी साखर वापरावी.
- घारग्यांसाठी केशरी पिवळ्या रंगाचा भोपळा घ्यावा. फिकट पिवळा भोपळा घेऊ नये.
- थापताना प्लॅस्टिक पिशवीला व हाताला पाणी लावावे. घारगा पिशवीला चिकटून बसत नाही.
- तळताना गॅसची आच मंद ठेवू नये, मध्यम ठेवावी. घारगे चांगले तळले जातात.
- तेलात सोडताना घारग्यांची खसखशीची बाजू नेहमी वर धरावी. त्यावर तूप उडवून घार्गे आकर्षकही करता येतात.
- घारगे नेहमीच कढवलेल्या ताज्या तुपाबरोबर वाढावे. चवदार लागतात.

No comments:
Post a Comment