Pages

Wednesday, 7 March 2018

गुलाबजाम : वळताना....



  • खवा आणताना तो किंचित पिवळसर आणि रवाळ असा घ्यावा, असा खवा ताजा असतो. 
  • खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक अगदी खोलवर जातो व गुलाबजामही हलके होतात. 
  • खवा मळताना मैद्याबरोबर थोडीशी दुधावरची जाड साय घालावी. गुलाबजाम मऊ व चविष्ट होतात. 
  • खव्यात मैदा घालू नये. त्याऐवजी बारीक रवा दुधात भिजवून खव्यासारखा सैलसर गोळा करावा आणि सुमारे तासाने खव्यात मिसळावा. गुलाबजाम अगदी हलके होतात. 
  • खव्यात मैद्याऐवजी गव्हाचे पीठ टाकले तर गुलाबजाम मऊ होतात. 
  • खव्यात लिंबाचा रस टाकून खवा चांगला मळून घ्यावा. गुलाबजाम मऊसूत होतात. 
  • खव्यात थोडीशी साखर मिसळावी, तळताना ती विरघळते आणि गुलाबजामला एक वेगळीच चव येते. 
  • खवा खूप सैल झाला तर गुलाबजाम तळताना फुटतात. एक चमचा मैदा घालून खवा परत मळावा, फुटत नाहीत. 
  • खवा मळताना त्यात दोन चिमूट वेलदोड्याची पूड मिसळावी, स्वाद चांगला येतो. 
  • गुलाबजाम वळताना आत साखरफुटाणा किंवा साखरेचा दाणा किंवा मनुक्याचा दाणा टाकावा. साखरेचा पाक आतपर्यंत छान मुरतो आणि गुलाबजाम मऊ व हलके होतात. 
  • गुलाबजामचा आकार लंबवर्तुळाकार करावा म्हणजे थोड्या तुपातच आतपर्यंत तळता तर येतात शिवाय थोड्या पाकात पसरट आकारामुळे जास्त बसतात. 
  • गुलाबजाम तळताना फुटू लागले तर त्यात थोडा उकडलेला बटाटा मऊसर मळून घालावा आणि तळावेत, फुटत नाहीत. 
  • खवा मिळत नसेल तेव्हा मिल्क पावडर वापरुन गुलाबजाम करावेत. 
  • चांगल्या दर्जाची होल मिल्क पावडरच वापरावी. नाहीतर गुलाबजाम चिवट होतात. 
  • मिल्क पावडरचे गुलाबजाम करताना मिश्रणात वेलचीची पूड घातल्यास गुलाबजामला मिल्क पावडरचा वास येत नाही. 

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?