Pages

Tuesday, 13 March 2018

गुलाबजाम : पाकात मुरवताना...


  • पाकात टाकल्याबरोबर गुलाबजाम वर तरंगले नाहीत तर ते आतमध्ये कच्चे आहेत असे समजावे. 
  • कमीत कमी चार तास पाकात मुरू दिल्यास गुलाबजाम जास्त चवदार होतात. 
  • पाकात मुरल्यानंतरदेखील वाढायच्या आधी गुलाबजाम दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवर ठेवावे, नरम तर होतातच पण चवही छान लागते. 
  • गुलाबजाम कडक व घट्ट झाले असल्यास झाकणाच्या डब्यात घालून पाच मिनिटे कुकरमध्ये वाफवावे, मऊसूत होतात. 
  • मंद गॅसवर ठेवून पुनःपुन्हा गरम केले तर गुलाबजाम जास्त फुगत जातात व पाक आतपर्यंत मुरतो, मऊही होतात. 
  • वाढताना दुसऱ्या दिवशी गुलाबजाम घट्ट आहेत असे वाटले तर वाढण्यापूर्वी एक उकळी द्यावी. परत हलके होऊन फुगून येतात. 

करून पहा !
  • गुलाबजामचा पाक उरला असेल तर त्यात शंकरपाळ्यांचे पीठ भिजवून शंकरपाळे करावे. 
  • गुलाबजांच्या उरलेल्या पाकात सफरचंद, केळी, चिकू, अननस इत्यादी फळांच्या बारीक फोडी घालाव्या व शिजवाव्या. फळांचा हा मुरांबा फ्रिजमध्ये ठेवल्यास आठएक दिवसतरी टिकतो.

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?