Pages

Friday, 9 March 2018

गुलाबजाम : तळताना....


  • गुलाबजाम शक्यतो रिफाईन्ड तेलात तळावेत. तुपकट होत नाहीत. 
  • गुलाबजाम डालडा तुपात तळले असतील तर थंड झाल्यावर तूप थिजते व ते पांढरट दिसतात. 
  • वाढण्यापूर्वी गुलाबजामवर गरम पाणी शिंपडल्यास त्यावरील तूप वितळते. 
  • गुलाबजाम तळताना मंद आचेवर तळावेत. प्रखर आचेवर तळल्यास आतून कच्चे राहतात व बाहेरून करपतात. कच्चे राहिल्यास पाकही आतपर्यंत मुरत नाही. 
  • प्रथम एक गुलाबजाम करून तळून पाहावा. तळताना त्याला पदर सुटू लागले तर खव्यात मैदा कमी झाला आहे असे समजावे व थोडा मैदा खव्यात मिसळून मग गुलाबजाम करावे. 
  • कढईत घातल्यावर थोड्या वेळाने गुलाबजाम तुपात तरंगला नाही तर गुलाबजाम घट्ट होणार असे समजावे. खव्यात नखभर सोडा व एक चमचा दूध घालून पुन्हा मळावे. मग गुलाबजाम वळावे. हलके होतात. 
  • तळताना कढई प्रत्येक वेळी गॅसवरून खाली उतरवून एका वेळी पाच ते सात गोळे त्यात सोडावे. गुलाबजामना एकसारखाच रंग येतो.

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?