Pages

Friday, 23 March 2018

जिलबी

  • नुसत्या मैद्याऐवजी मैदा व रवा समप्रमाणात घेऊन केलेली जिलबी जास्त कुरकुरीत होते. 
  • जिलबीच्या पिठात थोडेसे उडदाचे पीठ मिसळल्यास जिलबी अगदी चकचकीत दिसू लागते. 
  • डाळीच्या पिठाचे किंवा दह्याचे प्रमाण जास्त झाल्यास जिलबी ओबडधोबड दिसते. 
  • थंडीच्या दिवसांत जिलबी करायची झाली तर पीठ आदल्या दिवशी भिजवावे. चांगले आंबते. 
  • पीठ आंबवताना पिठाच्या भांड्यावर केळीचे पान ठेवावे. पीठ लवकर आंबते. 
  • जिलबी बनविताना आइसिंग ट्यूब किंवा आइसिंग गन वापरावी. जिलब्या एकसारख्या तर होतातच शिवाय पटकनही होतात. 
  • दुधाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीला भोक पाडून जिलबी घालण्यासाठी तिचा वापर करावा. 
  • जिलबी जाड हवी असेल तर ती घालताना हात तळणीजवळ धरावा. बारीक हवी असेल तर वरून जिलबी घालावी. 
  • जिलबी कडक हवी असल्यास जास्त तळावी. मऊ हवी असल्यास बेताची तळावी. 
  • तळणीला जास्त ताव आला तर जिलबी मऊ पडते. 
  • जिलबीच्या पाकात गुलाबपाणी किंवा व्हॅनिला घालावा. वेगळाच स्वाद येतो. 
  • पाकात लिंबाच्या सालीचा कडवटपणा येऊ नये म्हणून लिंबू कापून सालाची बाजू अंगठ्याने मधोमध दाबून रस काढावा. 
  • निम्म्या जिलब्या झाल्यावर पाक घट्ट झाला असे वाटल्यास पाकात अर्धी वाटी उकळते पाणी घालावे. 
  • जिलबीचे पीठ उरल्यास दुसऱ्या दिवशी त्यात रवा, मैदा मिसळून ठेवावा. पुन्हा जिलबीचे पीठ तयार होते.

No comments:

Post a Comment

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?