- आंबावडीत खोबरे घालावयाचे असल्यास ते आंब्याच्या माव्याबरोबरच पाकात घालावे. मिश्रणात चांगले एकजीव होते.
- आंबा वड्या करताना आंब्याचा मावा फारच घट्ट वाटला तर कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्यावा.
- साखर घालून शेंगदाण्याच्या वडीचे मिश्रण करताना मिश्रण ढवळत असताना खमंग वास सुटला, पातेल्याचे बूड दिसू लागले, मिश्रण चकचकीत दिसू लागले म्हणजे वडीसाठी मिश्रण तयार झाले असे समजावे.
- बेसनाच्या वडीत मावा घातल्यास वड्या मऊसूत होतात.
- तिळाचे लाडू किंवा वड्या करताना त्यात थोडेसे साजूक तूप घातल्यास वड्या खुसखुशीत आणि स्वादिष्ट होतात.
- आल्याची वडी नुसती केली तर तिखट होते. त्यात दूध, खवा, काजूपूड वगैरे घातल्यास चवदार व पौष्टिक होते.
No comments:
Post a Comment