- रसगुल्ले बनविण्यासाठी गाईचेच दूध वापरावे. त्यात स्निग्धांश कमी असतात. जास्त स्निग्धांश असलेल्या दुधाचे पनीर कोरडे होते व त्यामुळे रसगुल्ले जाळीदार होतात.
- रसगुल्ल्यांसाठी पनीर करताना दुधात लिंबूरसाऐवजी व्हिनिगर घालावे. पनीर जास्त चांगले होते. लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो.
- रसगुल्ले करताना एक लिटर दुधाच्या पनीरला मैद्याऐवजी एक टी-स्पून दुधाची पावडर वापरावी. रसगुल्ले स्वादिष्ट होतात.
- रसगुल्ल्याच्या पनीरमध्ये मैदा, रवा वगैरे काहीही मिसळायची जरुरी नसते. पनीर खूप मळल्याने रसगुल्ले हलके होतात. फुटतही नाहीत.
- पनीरचे गोळे करण्यापूर्वी एक चमचा साखर टाकावी. ती पाकात विरघळते आणि रसगुल्ले जाळीदार होतात. रसगुल्ले करताना नेहमी दुधावरची पहिली साय काढून टाकावी.
- रसगुल्ले उकळताना साखरेच्या मिश्रणात रिठ्याच्या पाण्याचे चार-पाच थेंब टाकले असता रसगुल्ले चांगले मऊ आणि फुगीर होतात.
- रसगुल्ल्यात बेकिंग पावडर टाकावी. रसगुल्ले हलके होतात.
- रसगुल्ल्याचे गोळे वळताना त्यात एक खडीसाखरेचा दाणा टाकावा. पाक आत शिरतो.
- रसगुल्ला पाकात टाकल्याबरोबर वर तरंगला म्हणजे पनीर चांगले मळले गेले आहे असे समजावे.
- तयार झालेला रसगुल्ला पाण्यात टाकून पाहावा. वर तरंगला तर समजावे चांगला झाला. जरासा बुडाल्यासारखा वाटला तर समजावे की बिघडला. मग पुन्हा गार पाण्याचे हबके मारून ते रसगुल्ले दहा-बारा मिनिटे तरी शिजवावे.
- पाक उकळत असतानाच त्यात रसगुल्ले सोडावे. उकळीबरोबर ते फुलतातच.
- रसगुल्ले पाकात टाकल्याबरोबर फुटत असतील तर पनीर अजून मळावे व फुटलेल्या रसगुल्ल्यावर उकळत असताना चिमूटभर साखर टाकावी. रसगुल्ला पाकात पूर्णपणे विरघळत नाही.
- प्रेशर कुकरमध्ये कच्चा पाक करून त्यात रसगुल्ले घालून झाकण लावावे. वर प्रेशर ठेवावे. गॅस बारीक करून दहा मिनिटे गरम करावे. नंतर लगेच प्रेशर कुकर नळाखाली ठेवावा व नंतर गार पाण्यात ठेवावा. रसगुल्ले हलके होऊन दुप्पट मोठे होतात.
रसमलई
- डब्यातील रसगुल्ले वापरायचे असल्यास ते गरम पाण्यात थोडावेळ भिजत ठेवावे. रसगुल्ले फुगून आकाराने दुप्पट होतात. नंतर ते रसमलईसाठी वापरावेत.
- रसमलईसाठी दूध आटवू नये, नाहीतर खाताना तोंडात साय येते.


No comments:
Post a Comment