- निम्मे दूध मोठ्या कढईत किंवा जाड बुडाच्या पसरट पातेल्यात घेऊन प्रखर आचेवर थोडे आटवावे. त्यात थोडी साखर घालून पुन्हा उकळी आणावी व उरलेले दूध घालून पुन्हा आटवावे. असे केल्याने बासुंदीचा रंग बदलत नाही व बासुंदी चांगली दाट होते.
- फिक्क्या गुलाबी रंगाची बासुंदी हवी असेल तर दूध मंद गॅसवर आटवावे.
- बासुंदी आटवताना पातेल्याच्या/कढईच्या तळाशी थोडे पाणी घालून मगच पदार्थ आटवण्यास ठेवावा. त्यात एक काचेची गोटी टाकावी. तळाशी काहीही चिकटत तर नाहीच पण पदार्थावरही सारखे लक्ष ठेवावे लागत नाही.
- कच्चे दूध तापवून त्यावर झाकण ठेवावे म्हणजे दुधातील सर्व साय त्यात विरघळते.
- बासुंदी आटवल्यावर त्यात थेंब दोन थेंब लिंबाचा रस टाकावा. बासुंदी अगदी रवाळ होते.
- बासुंदी आदल्या दिवशीच करून ठेवावी. किंचित घट्ट तर होतेच पण जास्त मुरल्यामुळे रुचकर लागते.
- बासुंदी करताना दूध उकळले की त्यात अगदी पातळ पोहे धुवून घालावेत व ते सतत ढवळीत राहावे. बराच वेळ उकळावे. पोहे घातले आहेत हे कळतही नाही एवढे एकजीव होतात. (१ लिटर दुधाला १ वाटी पातळ पोहे असे प्रमाण घ्यावे.)
- बासुंदीला दाटपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीत घालावे.
- बासुंदीत सुकामेवा ती शिजत असताना घालू नये, वाढतेवेळी हे सर्व टाकावे. छान चव लागते.

No comments:
Post a Comment