Pages

Wednesday, 14 February 2018

पुऱ्या : कणीक मळताना...

पोळीच्या कणकेपेक्षा पुऱ्यांची कणीक घट्ट मळावी. पुऱ्या खुसखुशीत तर होतातच शिवाय चांगल्या फुगतातही. कणीक सैल झाली तर पुऱ्या फुगत नाहीत, चिवट होतात. 
  • कणकेत फक्त मीठ घालून गार पाण्याने मोहन न घालता भिजवले तर पुऱ्या जड होत नाहीत.
  • कणीक मळताना मोहन थोडेसे जास्त घालावे आणि कणीक अगदी घट्ट मळावी पुऱ्या चिवट होत नाहीत. 
  • कणीक कोमट पाण्यात भिजवली आणि त्यात थोडीशी साखर घातली तर पुऱ्या चांगल्या फुगतात. 
  • कणीक मळताना त्यात मोहन घातले तरी पुऱ्या चांगल्या फुगतात. मोहन जास्त झाले तर मात्र पुऱ्या तेलकट होतात. 
  • कणकेत मोहन जास्त झाले तर थोडी कणीक व अर्धा चमचा बेसन घालावे, पुऱ्या तेलकट होत नाहीत. 
  • कणीक मळतानाच त्यात एक टेबलस्पून मैदा मिसळला असता पुऱ्या कुरकुरीत होतात. 
  • कणीक मळण्याआधी त्यात चमचाभर पिठीसाखर आणि थोडेसे कॉर्नफ्लोवर मिसळले तरी पुऱ्या कुरकुरीत होतात. 
  • कणीक भिजवताना थोडासा रवा तेलावर फुलवून घेऊन त्यात घातल्यास पुऱ्या खुसखुशीत होतात. 
  • कणकेत अर्धी वाटी रवा घालावा, पुऱ्या लवकर मऊ पडत नाहीत. 

1 comment:

सांजाच्या पोळ्या

कणीक चांगली तिंबून घ्यावी, नाहीतर पोळ्या चिवट होतात.  रवा कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.  रव...

... तर काय कराल ?